मुंबई - दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी चर्चा करुन राज्यातील सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यातील जनतेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच सावधगिरी म्हणून दिल्ली विमानतळ, सरकारी इमारती आणि महत्वाच्या ठिकाणी अलर्ट जरी करून सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सीआयएसएफने दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील करी रोड येथील फ्युचरेक्स मॅरॅथॉन इमारतीत कॉन्सुलेट जनरल ऑफ इस्राईलचे कार्यालय असून तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एन. एम जोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कार्यालय येते.
दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी