उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये कस्तुरबा गांधी लेडीज हॉस्टेलमध्ये महिला शिक्षिकेवर अश्लील व्हिडीओ बनवण्याचा आरोप आहे. आरोपी शिक्षिका भांडाफोड झाल्यावर फरार झाली. तर व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थिनींची तब्येत बिघडली आहे.
अलिगढच्या कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील एका महिला शिक्षिकेवर आरोप आहे की, तिने हॉस्टेलमध्ये मुलींचे अनेकदा अश्लील व्हिडीओ बनवले आहे. आरोपी आहे की, शिक्षिकेने मुलींना धमकी दिली आहे की, जर त्यांनी याबाबत कुणाला काही सांगितलं की, त्यांच्या घरातील लोकांवर खोट्या केसेस लावून फसवण्यात येईल.
ही माहीत जेव्हा मुलींच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली तर एकच गोंधळ उडाला आणि सगळे एकत्र येऊन होस्टेलमध्ये पोहोचले. त्यानंतर चौकशी अधिकारीही होस्टेलमद्ये पोहोचले. पण आरोपी शिक्षिका मोबाइल घेऊन फरार झाली. गुरूवारी सायंकाळी काही मुलींची तब्येत याकारणाने बिघडली की, आता आरोपी शिक्षिका व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल करेल का? कारण आता सर्वांसमोर तिचा भांडाफोड झाला आहे.
मुलींना लगेच स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसेच सूचना मिळताच जिल्हाधिकारीही होस्टेलवर पोहोचले. घाबरलेल्या विद्यार्थीनींनी सांगितलं की, त्यांना सायन्स शिकवणारी शिक्षिका रूबी राठोरने होस्टेलमध्ये कपडे बदलताना आणि आंघोळ करताना व्हिडीओ व फोटो काढले होते. या तक्रारीवरून रूबी राठोर, वार्डन आणि गेट कीपरवर कारवाई करण्यात आली आहे.
मात्र, रूबी राठोर फरार आहे. आता भीती आहे की, ती मुलींचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करेल की काय. इकडे मुलींची तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या कुटुंबियांनी गोंधळ घातला आहे आणि आरोपी शिक्षिकेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. कुटुंबिया म्हणाले की, त्या शिक्षिकेच्या मोबाइलमध्ये कशाप्रकारचे व्हिडीओ किंवा फोटो आहेत हे तिलाच माहीत. पण मुली इतक्या घाबरल्या आहे की, त्यांना भीती आहे की, शिक्षिका काहीतरी भलतं करेल.