6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:36 PM2024-07-01T14:36:09+5:302024-07-01T14:36:40+5:30

Alirajpur Case: आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी दिल्लीतील बुरारीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते.

Alirajpur Mass Sucide Case 5-members-of-same-family-found-hanging-in-alirajpur-mp | 6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले

6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले

Alirajpur Mass Suicide Case : आजच्याच दिवशी, म्हणजेच 1 जुलै 2018 रोजी दिल्लीतील बुरारी येथे झालेल्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आता तशाच प्रकारची घटना मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. ही हत्या की सामूहिक आत्महत्या? हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. 

अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस स्टेशन हद्दीतील रावडी गावात ही घटना घडली. मृतांमध्ये घरातील प्रमुख राकेश, त्याची पत्नी ललिता आणि मुलगी लक्ष्मी, दोन मुले अक्षय आणि प्रकाश यांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाचा खून झाल्याची भीती नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बुरारी घटनेत काय झाले?
दिल्लीतील बुरारी येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. आज 1 जुलै रोजी या घटनेला 6 वर्षे पूर्ण झाली. 30 जून 2018 रोजी रात्री उशिरा 12 ते 1 वाजेच्या सुमारास चुंडावत उर्फ भाटिया कुटुंबातील 11 जणांनी एकाचवेळी एकाच पद्धतीने सामूहिक आत्महत्या केली होती. दहा जण लटकलेल्या अवस्थेत सापडले होते, तर कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्य असलेल्या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जुलै 2018 रोजी त्या सर्वांच्या मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. बुरारी प्रकरणात असा दावा करण्यात येतो की, कुटुंबप्रमुख ललित भाटिया याने जादूटोण्याच्या प्रभावाखाली संपूर्ण कुटुंबाला सामूहिक आत्महत्या करण्यास भाग पाडले होते.

Web Title: Alirajpur Mass Sucide Case 5-members-of-same-family-found-hanging-in-alirajpur-mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.