पनवेल: खवले मांजरांची शिकार करणाऱ्या आरोपींना पनवेल वनविभागाने नुकतेच ताब्यात घेतले आहे.फिल्मी स्टाईलने पाठलाग करून या प्रकरणातील आरोपीना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील क्षणभर विश्रांती हॉटेल जवळ या घटनेतील आरोपी येणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती.दि. ११ रोजी या घटनेतील दोन आरोपी दोन वेगवेगल्या मोटारसायकवरून याठिकाणी आले. एकाच्या दुचाकीवर लाल रंगाचा पिशवीत खवले मांजराचे अवशेष आढळल्याने वनविभागाने या घटनेतील दोघांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेत प्रवीण बबन जाधव(रत्नागिरी),ज्ञानेश्वर शिवकर(पेण), प्रतीक भास्तेकर(माणगाव) या आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी थांबवून त्यांची झाडाझडती घेऊन त्यांच्याकालडील खवले मांजराचे अवशेष हस्तगत केले. यावेळी आरोपी घटनास्थळावरून पळ काढू लागताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून भारतीय वन्य जीव अधिनियम नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.उपवनसंरक्षक आशिष ठाकरे तसेच सहा वनसंरक्षक डी एस सोनावणे ,वनक्षेत्रपाल पी बी मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली आहे. या तीन आरोपींची चौकशी केली असता या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी सहभागी असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.
सौरभ पाटील आणि किरण पवार या दोन आरोपींची नावे पुढे आली. संबंधित आरोपी पेन तालुक्यातील खारपाले व कळद गावातील रहिवासी आहेत. त्याठिकाणी जाऊन संबंधित आरोपीना अटक करण्यात आली. यावेळी या आरोपींनी मुंबई गोवा महामार्गावर जे डब्ल्यूसी कंपनीच्या पुढे असलेल्या शालिमार हॉटेलजवळ खवले मांजर या वन्यप्राण्यांची खवल्यांनी भरलेली बॅग ज्याठिकाणी टाकली होती.ती जागा दाखवली. याठिकाणी तब्बल ३ किलो वजनाची खवले खाटनास्थळी सापडले.
या घटनेतील आरोपीना दि. १२ रोजी पनवेल मधील प्रथम वर्ग न्यायालयात हजार केले असता .या आरोपींना दि. १५ ऑकटोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमा अंतर्गत वन्यजीवाना इजा पोहचविणे त्यांच्या जीविताला धोका निर्माण करणे वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा असल्याने अशाप्रकारे वन्यजीवाना धोका निर्माण केल्यास कडक कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया वनविभागाचे अधिकारी डी एस सोनावणे यांनी दिली.