मेरठ - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्याकडून ८ कोटींची लूट करणाऱ्या कुख्यात गुंडाचा मेरठ पोलिसांनी चकमकीत गोळ्या घालून खात्मा केला आहे. गुंड शक्ती नायडूची माहिती देणाऱ्या दिल्ली आणि मेरठ पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.दिल्लीचा कुख्यात गुंड असलेल्या शक्ती नायडू यांची मंगळवारी कांकरखेडा येथील वैष्णो धाम कॉलनी येथे चकमकीत मेरठ पोलिसांनी गोळ्या घालून खात्मा केला. या दरम्यान सीओ दौराला यांच्या पोटाला गोळी लागली. एक गोळी एसएसपीच्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये जाऊन अडकली.
'या' अभिनेत्रीच्या पतीचे ८ कोटी लुटणाऱ्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी केला एन्काउंटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 19:42 IST
गुंड शक्ती नायडूची माहिती देणाऱ्या दिल्ली आणि मेरठ पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
'या' अभिनेत्रीच्या पतीचे ८ कोटी लुटणाऱ्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी केला एन्काउंटर
ठळक मुद्देशक्ती नायडू यांची मंगळवारी कांकरखेडा येथील वैष्णो धाम कॉलनी येथे चकमकीत मेरठ पोलिसांनी गोळ्या घालून खात्मा केला. नायडूने पॅरोलवर सुटल्यानंतर स्पेशल सेल, दिल्लीचे एसीपी ललित मोहन नेगीची हत्या कट रचत होता.