अमळनेर : मोटरसायकलवर आलेल्या तीन जणांनी व्यापाऱ्याच्या तोंडावर स्प्रे मारून त्याच्याकडील दोन लाख रुपये हिसकावून नेले. ही घटना २७ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अमळनेरातील चोपडा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ घडली .
सिंधी कॉलनीतील येथील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद नागदेव यांचे अमळनेर शहरात किराणा दुकान आहे. २७ रोजी रात्री ते दुकान बंद करून २ लाख रुपयांची रक्कम बॅगमध्ये भरून घरी जायला निघाले. मोटरसायकलवर मागे त्यांचा भाऊ बसलेला होता चोपडा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ आले असताना अचानक मागाहून एक मोटरसायकलवर तीन जण आले आणि त्यांनी त्यांच्या हातातील स्प्रे दोघा भावांच्या तोंडावर मारला.
स्प्रेमुळे दोघे गोंधळले आणि तेव्हड्यात तिघांनी २ लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला. जितेंद्र नागदेव यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत. गेल्या काही दिवसात मोटरसायकल वरून येऊन जबरी चोऱ्या करण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.