शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Amaravati Murder Case: अमरावती हत्याकांडात मोठा खुलासा; उमेशच्या हत्येत मित्राचा हात, अंत्यसंस्कारातही झाला सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 4:50 PM

Amaravati Murder Case: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी युसूफ खानसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Amaravati Murder Case: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडातील मुख्य आरोपीसह आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हे यांचा 6 आरोपींनी गळा चिरून खून केला होता. या हत्याकांडात एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत आहेत. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, मृत उमेश कोल्हे याच्या हत्येत त्याचा जवळचा मित्र डॉ. युसूफ खान याचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.. 

अंत्यसंस्कारातही सहभागी झालाउमेश कोल्हे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांच्या गळ्यावर 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल जखमा आढळून आल्या. चाकूने मेंदूच्या मज्जातंतूला इजा झाल्याचे अहवालात पुढे म्हटले आहे. यासोबतच श्वासोच्छवासाची नळी, अन्नाची नळी आणि डोळ्याच्या नसांनाही मोठी इजा झाली आहे. विशेष म्हणजे, कुणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी युसूफ उमेशच्या अंत्यसंस्कारात आला होता. 

व्हॅट्सअॅपवर शेअर केली पोस्टयुसूफ खान हा ‘ब्लॅक फ्रीडम’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य आहे. या ग्रुपमध्ये उमेशने नुपूर शर्माला सपोर्ट करणारी पोस्ट फॉरवर्ड केली होती. त्यानंतर युसूफ खानने ती पोस्ट ‘रहबरिया ग्रुप’ला पाठवली. त्या ग्रुपमध्ये हत्याकांडातील मास्टरमाइंडही होता. कोल्हे यांची ती पोस्ट पाहून चिडलेल्या आरोपीने 16 जून रोजी साथीदारांसोबत बैठक घेतली आणि उमेशच्या हत्येचा कट रचला. यानंतर कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

एनजीओला पाकिस्तानी फंडिंगएनआयएच्या एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, ही हत्या एका वर्गाला धमकावण्याचा प्रयत्न आहे. इरफान रायबर हेल्पलाइन नावाची एनजीओ चालवतो आणि जवळपास 21 लोक त्याच्याशी संबंधित असल्याचेही तपासात समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येतील इतर आरोपीही याच एनजीओशी संबंधित आहेत. या एनजीओला काही आखाती देश आणि पाकिस्तानमधून निधी मिळत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. 

मास्टरमाइंडसह सर्व 6 आरोपींना अटकउमेशचा मुलगा संकेत कोल्हे याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा वल्द शेख ईब्राहिम (22),  अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलीम (24), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (25), शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (22), अतिब रशीद वल्द आदील रशीद (22) आणि युसूफ खान बहादूर खान (44) यांना अटक केली आहे. या आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू