शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

रुग्णवाहिका चालकाने जास्त पैसे मागितले; हतबल मुलाने खांद्यावर टाकून नेला आईचा मृतदेह, चालकावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 2:23 PM

या घटनेनंतर पोलिसांनी खाजगी वाहन चालकांसाठी जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते.

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधून गुरुवारी एक धक्कादायक चित्र समोर आले. रुग्णवाहिका चालकाने जास्त पैसे मागितल्यामुळे हतबल मुलाने आपल्या खांद्यावर आईचा मृतदेह टाकून नेल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर जास्तीचे तीन हजार रुपये खंडणी मागणाऱ्या चालकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक विश्वजित महतो यांनी दिले आहेत. या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

लक्ष्मीराणी दिवाण नावाची महिला आजारी पडली होती आणि तिला जलपाईगुडी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. मृतदेह नेण्यासाठी स्थानिक चालकाने मुलाकडे 3000 रुपयांची मागणी केली. मुलगा देऊ शकला नाही. ऑटोचालकांनी मृतदेह ठेवण्यास नकार दिला.

यानंतर आपल्या आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन रोजंदारी करणारा तरुण चालायला लागला. वडील मृतदेहाला खांदा देत होते. जलपाईगुडीपासून क्रांतीचे अंतर सुमारे पन्नास किलोमीटर आहे. सकाळी सात वाजता मृतदेह घेऊन जातानाचे हे भीषण चित्र पाहून अनेकजण हादरले. काही अशासकीय संस्थांच्या मदतीने मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. 

आरोपी चालकावर कारवाई करण्याचे आदेश दिलेहर्से व्हेईकल असोसिएशनचे सचिव दिलीप दास म्हणाले, “आम्हाला आज पोलिसांकडून अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, ज्यांचे आम्ही निश्चितपणे पालन करू. तसेच आज रात्री आम्ही एक बैठक घेऊ आणि नवीन दर चार्ट तयार करू." दुसरीकडे पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जलपाईगुडी जिल्हा पोलिसांनी जलपाईगुडी सदर वाहतूक कार्यालयात खाजगी वाहन चालकांसाठी जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. जलपाईगुडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप सेन यांनी जनजागृती शिबिरात चालकांना अधिक मानवतेने वागण्याचे आवाहन केले.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी