शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

Video - "परत द्या..."; शिक्षकाने फोन घेतला, विद्यार्थिनीला राग आला; 'तिने' डोळ्यात मिरची स्प्रे मारला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 11:25 AM

एका विद्यार्थिनीचा फोन शिक्षकाने घेतला त्यानंतर ती प्रचंड संतापली.

शाळा-कॉलेजमध्ये अनेकदा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे फोन घेतले जातात. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच राग येतो, मात्र लेक्चर संपल्यानंतर शिक्षक फोन विद्यार्थ्यांना परत करतात. याच दरम्यान अमेरिकेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीचा फोन शिक्षकाने घेतला त्यानंतर ती प्रचंड संतापली. रागाच्या भरात विद्यार्थिनीने शिक्षकावर मिरचीचा स्प्रे मारला. ही घटना टेनेसीच्या नॅशविल जवळील एंटओक हायस्कूलमध्ये घडली आहे. 

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, घटनेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासोबतच विद्यार्थिनीच्या या वागणुकीबाबत लोकांमध्ये नाराजी होती. व्हिडीओ Reddit वर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, विद्यार्थिनीने शिक्षकावर मिरचीचा स्प्रे फवारल्यानंतर ती वर्गातून बाहेर पडताना दिसत आहे. तिने वर्गाबाहेरही शिक्षकाचा पाठलाग केला आणि तिचा फोन परत मागितला.

विद्यार्थिनी लेक्चर सुरू असताना फोन वापरत होती आणि गुगलवरून प्रश्नांची उत्तरं देत होती. यानंतर शिक्षकाने तिचा फोन घेतला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा तिने शिक्षकाकडून फोन परत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिक्षक आपला हात काढून घेतो. यानंतर, विद्यार्थी पुन्हा शिक्षकावर मिरचीचा स्प्रे फवारते. त्यानंतर शिक्षक वेदनेने रडत जमिनीवर पडतो. याच दरम्यान विद्यार्थिनी ओरडत तिचा फोन परत मागत राहते.

Reddit वर व्हिडिओ पोस्ट करणार्‍या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, याआधी त्याच शिक्षकाने दुसऱ्या विद्यार्थ्याचा फोन जप्त केल्यावर त्याला मारलं होतं. विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडलं. युजरने सांगितले की, एंटिओक हायस्कूलमध्ये हा प्रकार सर्रास घडतो. या घटनेमुळे इंटरनेटवर लोकांमध्ये संताप निर्माण झाला. अनेक य़ुजर्सनी हा थेट हल्ला असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Teacherशिक्षक