शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी? खुद्द अमित शहांनी पाठविले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 4:31 PM

सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची विनंती मान्य करत गृहमंत्री अमित शहा यांनी जन अधिकार पार्टीचे पप्पू यादव यांना पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्दे अमित शहा यांच्या कार्यालयातून मिळालेल्या पत्राची एक प्रत यादव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर शेअर केली. यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये शहा यांना सुशांतप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.

सुशांत सिंग राजपूत याने महिनाभरापूर्वी १४ जून रोजी आत्महत्या केली होती. मात्र, त्याच्या चाहत्यांना सुशांतच्या आत्महत्येची बातमी खरी वाटत होती. ३४ वर्षीय अभिनेत्याच्या अकाली निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीत नेपोटिझम, आवडती व्यक्तीला दिले जाणारे प्रोत्साहन यावर चर्चा सुरू झाली, तर अनेक राजकीय व्यक्तींसह अनेकांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती केली. अभिनेत्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे का? यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी अनेकांनी केली. सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची विनंती मान्य करत गृहमंत्री अमित शहा यांनी जन अधिकार पार्टीचे पप्पू यादव यांना पत्र पाठविले आहे.अमित शहा यांच्या कार्यालयातून मिळालेल्या पत्राची एक प्रत यादव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर शेअर केली. यादव यांनी १६ जून २०२० रोजी विनंती केली होती, जिथे सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. सीबीआय एमएचएअंतर्गत (मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स) आणि ते डीओपीटी  (Department of Personnel and Training) च्या अधिपत्याखाली येत नसल्यामुळे ते संबंधित मंत्रालयाकडे पाठवत असल्याचे अमित शाह यांनी पत्रात म्हटले आहे.यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये शहा यांना सुशांतप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्वीटमध्ये  "अमित शाह जी आप चाहें तो एक मिनट में सुशांत मामले की CBI जांच हो सकती है। इसे टालें नहीं! बिहार के गौरव फ़िल्म अभिनेता सुशांत सिंह राजपूत जी की संदिग्ध मृत्यु की CBI जांच के लिए केंद्रीय गृह मंत्री जी को पत्र लिख आग्रह किया था। उन्होंने कार्रवाई के लिए पत्र अग्रसारित कर दिया है। असे नमूद केले आहे. (अमित शाह जी, तुमच्या मनात असेल तर एका मिनिटात सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी होऊ शकते. ते टाळू नका!) अशी विनंती करणारे पात्र केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले. बिहारचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सीबीआय चौकशीसाठी शहा यांनी संबंधित मंत्रालयाला कारवाईसाठी पत्र पाठवले आहे.यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनीही सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी याबाबत ट्विटरवर ट्विट केले होते. दरम्यान, सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचा मुंबई पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात एकूण ३० पेक्षा जास्त जणांनी जबाब नोंदवले असून त्यात त्यांचे कुटुंब, मैत्रीण रिया चक्रवर्ती, दिल बेचारचा दिग्दर्शक मुकेश छाब्रा, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, ज्यांच्यासोबत काम करायचे होते तेही होते. सुशांतच्या अनेक व्यावसायिक आणि वैयक्तिक संपर्कांना समजून घेण्यासाठी प्रश्न विचारले जात आहे, तसेच  फिल्म इंडस्ट्रीत अस्तित्त्वात असलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे अभिनेता स्वतःचा जीव घेण्यास भाव पडले का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. 

 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

 

माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिसAmit Shahअमित शहाMumbaiमुंबईHome Ministryगृह मंत्रालय