Amritpal Singh:पंजाबपोलिसांना मोठे यश मिळाले आहे. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगचा खास साथीदार पप्पलप्रीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपाल असूनही फरार असून, पोलीस त्याचा पंजाबसह इतर राज्यातही शोध घेत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांनी स्पेशल सेलच्या मदतीने मोठी कारवाई करत पप्पलप्रीतला अटक केली आहे. अमृतपालचा उजवा हात म्हणून ओळख असलेल्या पप्पलप्रीतच्या अटकेनंतर आता अमृतपालच्याही अटकेची आशा निर्माण झाली आहे.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालंधरमधून फरार झालेला पप्पलप्रीत सतत अमृतपालसोबत होता आणि दोघेही होशियारपूरमध्ये वेगळे झाले. पोलिसांनी पप्पलप्रीतला होशियापूर येथून अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पप्पलप्रीतचा पाकिस्तानच्या आयएसआयशी थेट संपर्क असल्याचा दावा करण्यात आला होता. पप्पलप्रीत सिंग हा अमृतपालचा मुख्य हस्तक असल्याचे सांगण्यात येते. अमृतपाल पप्पलप्रीतला आपला गुरू मानतो. तो अमृतपाल याचा माध्यम सल्लागारही आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये खलिस्तानचे वातावरण निर्माण करण्यासाठी पप्पलप्रीत थेट आयएसआयच्या संपर्कात होता. तो राज्यात दहशतवाद पसरवण्याच्या कटात गुंतला असल्याचीही माहिती समोर आली आहे.
पप्पलप्रीत स्वतःला पत्रकार म्हणवतोपप्पलप्रीत स्वतःसा व्हिडिओ पत्रकार आणि कार्यकर्ता म्हणवतो. यापूर्वी 2017 मध्ये तो सिमरनजीत सिंग मान यांच्या शिरोमणी अकाली दल (अमृतसर) मध्ये सामील झाला होता. मात्र 9 महिन्यांनी त्याने पक्ष सोडला. पप्पलप्रीत खलिस्तान प्रचाराची वेबसाइटही चालवतो, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2015 मध्ये शिरोमणी अकाली दल (बादल) सरकारने पप्पलप्रीतवर आयएसआयशी असलेल्या कथित संबंधांच्या आधारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.
पप्पलप्रीतवर यूएपीएसह अनेक गुन्हे दाखल आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यानंतर 2016 मध्येही पप्पलप्रीतला अटक करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तपास यंत्रणांना असेही कळले की, पप्पलप्रीतने 2018-19 मध्ये आयकर रिटर्नमध्ये दिलेली बँक खात्याची माहिती पडताळणीदरम्यान बनावट असल्याचे आढळून आले. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, असे कोणतेही बँक खाते अस्तित्वात नाही.