अख्ख्या पंजाबमध्ये गेला महिनाभर धुडगुस घालणाऱ्या खलिस्तानी समर्थक गुंड अमृतपालसिंगला आता पोलिसांनी शोधण्यास सुरुवात केली आहे. गेले महिनाभर पोलीसच लपून छपून राहत होते, खलिस्तानी समर्थकांचा मार खात होते. आता पोलीस अॅक्शनमध्ये आले असून अमृतपालच्या १७४ समर्थकांना अटक करून हजार किमीवरील आसामच्या तुरुंगात नेऊन टाकले आहे. परंतू अमृतपाल काही हाती लागलेला नाहीय.
कोणी म्हणत होता, तो पाकिस्तानात पळाला कोणी म्हणत होता वेशांतर करून पंजाबबाहेर गेला. परंतू, अमृतपाल पंजाबमध्येच असल्याचे नवीन अपडेट समोर आले आहेत. अमृतपाल वारंवार पोलिसांना चकमा देऊन पंजाबमध्ये लपून छपून फिरत आहे.
शनिवारची ताजी घटना समोर आली आहे. एका घरात मुलाला पाहण्यासाठी मुलीकडील मंडळी येणार होती. हे घर ग्रंथ शिकविणाऱ्याचे होते. परंतू मुलीकडचे येण्यापूर्वीच अमृतपाल तिथे दाखल झाला. ग्रंथी आहेत का असे विचारले. घरातील महिलेला मुलीकडचीच मंडळी आल्याचे वाटले. परंतू अमृतपाल थेट बाथरुममध्ये शिरला आणि तिथे त्याने ग्रँथीच्या मुलाचे कपडे घातले. यानंतर बाहेर येत जेवण वाढण्यास सांगितले.
अमृतपालकडे रायफल, पिस्तुल आणि मोठ्या संख्येने काडतुसे होती असे या कुटुंबीयांनी पोलिसांना चौकशीत सांगितले. पाहुण्यांसाठी बनविलेल्या जेवणावर यथेच्छ ताव मारुन अमृतपालने कोणला तरी फोन करून तिथे बोलवून घेतले. घरापासून काही अंतरावर एक मारुती ब्रेझा आणि दोन दुचाकींवरून काही व्यक्ती आलेल्या होत्या. त्यात बसून तो निघून गेला, असे या कुटुंबाने पोलिसांना सांगितले.
अमृतपाल या घरात जवळपास १ तास थांबला होता. त्याने मुलाची गुलाबी रंगाची पगडी देखील नेली. ग्रंथीकडे शिकायला असणाऱ्या मुलाकचे जॅकेटही त्याने नेले. ते त्याला मोठे होते होते. अमृतपालचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी शोधून काढले आहे.