शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रिक्षाचालकाकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न?; वर्सोव्यात निर्जनस्थळी चालकाने नेले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 10:04 AM

चालू रिक्षामध्ये ती त्याला सतत जाब विचारत होती; मात्र उत्तर न देता तो गाडी चालवीत होता.

गौरी टेंबकर - कलगुटकर मुंबई : कोरियन यूट्युबरसोबत छेडछाडनंतर वर्सोवामध्ये  एका तरुणीचे रिक्षाचालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शनिवारी करण्यात आला. ही तरुणी व्यवसायाने इंटेरियर डेकोरेटर असून या घटनेनंतर ती चांगलीच घाबरली असल्याने याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

तरुणीचे नाव ऋचा अटल असे असून, अंधेरी लोखंडवाला परिसरातून दुपारी एकच्या सुमारास तिने वीरा देसाई रोड येथे  जाण्यासाठी (एमएच०२०१ ६१३५)  रिक्षा पकडली. मोबाईलवर गाणी ऐकत असल्याने तिचे लक्ष त्यावरच होते जी तिची मोठी चूक असल्याचे ती सांगते. बराच वेळ होऊनही इच्छित स्थळी कसे पोहोचले नाही असे वाटल्याने तिने आसपास पाहिले. तेव्हा भलत्याच निर्जनस्थळी आपण आल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे ती रिक्षाचालकावर ओरडली आणि मला इथे का आणले ? असे त्याला विचारले. चालू रिक्षामध्ये ती त्याला सतत जाब विचारत होती; मात्र उत्तर न देता तो गाडी चालवीत होता. त्यामुळे तिने  मैत्रिणीला चॅटवर घडला प्रकार सांगितला. मैत्रिणीने ऋचाला लोकेशन मागितले. त्यामुळे तो वर्सोवा म्हाडा परिसर असल्याचे ऋचाला समजले. दरम्यान, तिची सिद्धी नावाची मैत्रीण त्याच परिसरात कॉफी पिण्यासाठी आली होती. तिला ऋचाने रिक्षा क्रमांकाचा फोटो शेअर केला, मात्र ती एकटी असल्याने काहीच करण्याची हिंमत तिला झाली नाही.

पोलिसांची गाडी पाहून यू टर्नमी आय लव्ह वर्सोवा लोकेशनच्या आसपास होते. तिथे दूरवर पोलिसांची एक गाडी उभी होती ज्याच्या जवळ एक पोलिस कर्मचारी फोनवर बोलत उभे होते. या पोलिसांना पाहून चालक यू टर्न घेऊ लागला. मी कुणाला तरी पत्ता विचारतो असे मला सांगू लागला. मात्र, पोलिसांना पाहून मला धीर आला आणि आत्ताच्या आत्ता मला इथेच उतरव असे मी त्याला सांगितले. कारण मला त्याच्या तावडीतून सुटायचे होते. - ऋचा अटल, पीडित तरुणी

घाबरल्याने तक्रार नाहीघडला प्रकार ऋचा हिने तिची फ्लॅटमेट प्रोमिता मुखर्जी यांना सांगितला. त्यानुसार त्यांनी लगेचच याप्रकरणी मुंबई पोलिसांना ट्विट केले.ऋचा या प्रकारामुळे घाबरली असून, ती रविवारी बाहेरगावी जाणार असल्याने ती परत आल्यावर या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे तिच्या निकटवर्तीयानी सांगितले.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस