प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमधील हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अलीकडेच त्यांनी एक वादग्रस्त ट्विट केले होते. त्यावरुन एफआयआर नोंदवला गेला आहे. वर्मा यांनी द्रौपदी, पांडव आणि कौरव याबाबत वादग्रस्त ट्विट केले होते.
राम गोपाल वर्मा यांनी २५ जून रोजी केलेल्या ट्विटवर अत्यंत आदरणीय द्रौपदी या राष्ट्रपती असणार आहेत. दोघेही पांडव आणि कौरव आपापली लढाई विसरून जातील. तसेच ते एकत्र येऊन त्यांची (द्रौपदीची) पूजा करतील आणि मग महाभारत नव्या भारतात पुन्हा लिहिल जाईल आणि संपूर्ण जगाला भारताचा अभिमान वाटेल. जय भाजप, असा खोचक ट्विट केले आहे. ही पोस्ट म्हणजे वर्मा यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती उमेदवारी अर्जावरुन भाजपला टोला लगावला आहे. या ट्विटवरुनच प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.