खामगाव : काठी फेकून मारल्याचा राग अनावर झालेल्या एका ७५ वर्षीय म्हाताऱ्याने म्हातारीला बेदम मारहाण केली. यात वर्मी घाव बसल्यामुळे झाला. म्हातारीचा खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री शिराळा येथे घडली. याप्रकरणी म्हाताऱ्याविरोधात हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!
पार्वताबाई एकनाथ वनारे (७०, रा. हिवरखेड) आणि एकनाथ महादू वनारे (७५, रा. शिराळा) दोघेही नात्याने पती पत्नी आहेत. शुक्रवारी सायंकाळी दोघांमध्ये शिराळा येथे किरकोळ वाद या वादातून म्हातारीने वृद्धाला काठी फेकून मारली. काठी फेकून मारल्याचा राग अनावर झालेल्या वृद्धाने तिला जीव जाईस्तोवर मारहाण केली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच, त्यांनी जखमी अवस्थेत वृद्धेला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान वृद्धेची प्राणज्योत मालविली, अशी तक्रार शिराळा येथील पोलिस पाटील संतोष दत्तू आटाळ (४५) यांनी हिवरखेड पोलिसांत दिली.
महिला तुरुंग अधिकारी कैद्याच्या प्रेमात; किसच्या बदल्यात..., अधिकारीही पडले बुचकळ्यात!
या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी एकनाथ महादू वनारे या वृद्धाविरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. वृद्धानेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे हिवरखेड पोलिस स्टेशन हद्दीत एकच खळबळ माजली आहे. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"