दिल्लीतील साकेत न्यायालय परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आज, शुक्रवारी एका महिलेवर भरदिवसा गोळ्या झाडण्यात आल्या. तिच्या पतीनेच महिलेवर गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांचे पथक या घटनेचा तपास करत आहे.
अतिक अहमदच्या जवळच्यांचे फोन अचानक बंद, सर्व्हिलान्सवरील 3000 मोबाईलवर NO RESPONSE! या महिलेच्या पतीनेच महिलेवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात महिला जमिनीवर पडली. आरोपी पती वकिलाच्या वेशात कोर्टात पोहोचला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये पूर्वीपासूनच कोर्टात खटला सुरू होता.
गोळीबाराच्या घटनेनंतर न्यायालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लोक इकडे तिकडे धावताना दिसत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल केले. मात्र या घटनेने न्यायालय परिसरात घबराट पसरली आहे.
साकेत कोर्टात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून मंत्री सौरभ भारद्वाज यांनी एलजीवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की नवीन एलजी साहेब आल्यानंतर दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पोलिसांच्या कार्यशैलीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सौरभ भारद्वाज म्हणाले की, कोर्टात दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या जात आहेत. दिल्ली पोलीस ३५० कोटींच्या भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडाले आहेत.
या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही लोक महिलेला घेऊन जात असल्याचे दिसत आहे.