दुकानाच्या उद्घाटनावेळी अश्लील गाणं; फेमस युट्यूबरला पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 08:13 PM2023-06-23T20:13:26+5:302023-06-23T20:14:39+5:30
युट्यूबर थोप्पी (२४) याच्यावर स्थानिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर गुरुवारी पोलिसांनी खटला दाखल केला आहे
कोची - केरळच्या मल्लपूरममध्ये नुकतेच एका दुकानाच्या उद्घाटनासाठी आलेल्या युट्यूबरला पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. उद्घाटनप्रसंगी आपत्तीजनक विधान करणे आणि गर्दी जमा करुन वाहतुकीला अडथळा केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी या युट्युबरला कोचीतील एका घरातून अटक केली. उत्तर मलप्पुरमच्या वालंचेरी येथे घेऊन गेल्यानंतर युट्यूबरला अटक करण्यात आली. जेथे काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
युट्यूबर थोप्पी (२४) याच्यावर स्थानिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर गुरुवारी पोलिसांनी खटला दाखल केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. आरोपीचे खरं नाव निहाद असून तो कन्नुर जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्याच्या युट्यब चॅनेलचे लाखो फॉलोअर्स असून त्या लहान मुलांचाही समावेश आहे.
पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, आम्हाला आरोपीचा दरवाजा तोडावा लागला. कारण, सातत्याने आवाज देऊनही, त्याने दरवाजा उघडला नाही. आम्ही अर्धा तास वाट पाहिली, तरीही त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे, आम्हाला दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घ्यावे लागले. थोप्पीने आपल्या फोनवर लाईव्ह रेकॉर्डींग सुरू केले होते, त्यामुळे पोलीस आल्याची आणि त्याला अटक केल्याची बातमी सोशल मीडियातून सर्वांपर्यंत पोहोचली.
थोप्पी ज्या कार्यक्रमासाठी उद्घाटक बनून गेला होता, त्या कार्यक्रमाला युवक आणि लहान मुलांचीही मोठी गर्दी जमली होती. या कार्यक्रमात गाणे म्हणतात अश्लील शब्दांचा प्रयोग थोप्पीने केला. त्यामुळे, थोप्पी आणि दुकानाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.