लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारात १५ लाखांवरून थेट ५ कोटी रुपये पगार घेणारा आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयातील साधू म्हणून वावरत, चित्रा रामकृष्ण यांना एनएसईचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडत होते, असे सीबीआयने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.
चित्रा रामकृष्ण यांनी एका तेल कंपनीत काम करणाऱ्या सुब्रमण्यम यांची एनएसईच्या ग्रुप ॲापरेटिंगपदी आणि सल्लागारपदी नियुक्ती केली, तसेच हिमालयातील साधूला बाजारातील अतिशय गोपनीय माहिती दिली, असा चित्रा यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने चित्रा आणि सुब्रमण्यम यांना जामीन देण्यास विरोध केला आहे. विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल हे आनंद सुब्रमण्यम यांनी २०१८ मध्ये केलेल्या को-लोकेनेशन घोटाळ्याप्रकरणी जामीन अर्जावर सुनावणी घेतली.
तुम्ही ४ वर्षांनंतर अचानक जागे कसे झालात?सुब्रमण्यम हा परदेशात पळून जाण्याचा धोका आहे. तो अनेक वर्षे साधू म्हणून वावरत आहेत, असा युक्तिवाद सीबीआयने केला. यावर सुब्रमण्यम यांचे वकील, अर्शदीप यांनी सांगितले की, हा घोटाळा २०१० ते २०१४ दरम्यान झाला आहे. सुब्रमण्यम हे २०१३ मध्ये एनएसईत झाले. सेबीच्या चौकशीतही त्यांच्याबाबत आढळून आले नाही. यावर न्यायधीश म्हणाले, आनंद सुब्रमण्यम हिमालयातील साधू आहेत. दैवी शक्तीमुळे तुम्ही हिमालयाच्या उंच भागात राहत होते. सीबीआय या प्रकरणात चार वर्षांपासून तपास करीत आहे. मला माहीत नाही का पण ते आताच अचानक जागे झाले आहेत, असा टोला न्यायालयाने लगावला आहे.
आमच्याकडे सर्व पुरावेसीबीआयचे वकील व्ही. के. पाठक म्हणाले की, सुब्रमण्यम हे चित्रा रामकृष्ण यांना ओळखत होते. त्यांनी चित्रा यांना निर्णय घेण्यासाठी भाग पाडले. याचे पुरावे आहेत.