शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

...आणि तो निघाला तोतया अधिकारी, शिताफीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:01 AM

ठाणे  : सहायक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून आपल्या साथीदाराचे मदतीने एका रिक्षाचालकाला गणपती रोडवर अडवून त्याच्याजवळील मोबाइल हिसकावला. त्यातील ...

ठाणे  : सहायक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून आपल्या साथीदाराचे मदतीने एका रिक्षाचालकाला गणपती रोडवर अडवून त्याच्याजवळील मोबाइल हिसकावला. त्यातील तो संदेश डिलीट कर असे सांगत मोबाइल हाताळून मोबाइलमध्ये असलेल्या एक्सोडुस नावाच्या बिट कॉइन ॲपमधून सात हजार ६६९ डॉलर अर्थात भारतीय चलनात पाच लाख ७२ हजार ९६४ रुपये त्यांच्या स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करून घेऊन रिक्षाचालकाची फसवणूक केल्याचे प्रकरण उघड केले आहे. फसवणूक करणाऱ्या तोतया पाेलिसाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव रामदास जगताप (४१, रा. कळवा) असे आहे. अटक आरोपी याने रिक्षाचालकाची फसवणूक केल्याची तक्रार कळवा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानुसार हिरव्या रंगाची कारविषयी त्यांना माहिती मिळाली. या कारच्या नंबरची माहिती आरटीओकडून मिळाली. तसेच, मोबाइल नंबरच्या तांत्रिक तपास व इतर माहितीच्या आधारे आरोपी याचा राहण्याचा पत्ता शोधण्यात आला. तो कशेळी भिवंडी येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. 

अधिक माहिती घेतली असता रामदास कळवा येथे राहत असल्याची माहिती तपासात पुढे आली. अटक आरोपीकडून गुन्ह्यात फसवणूक केलेल्या रकमेपैकी एक लाख ४० हजार, बनावट गणवेश, एक लाख ६० हजार रुपये किमतीची कार असा तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी