शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 8:07 PM

बुधवारी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर जलद गतीने सुनावणी होणार की नाही याचा निकाल येईल.

ठळक मुद्दे या प्रकरणी जामीन दिला तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं देखील कोर्टाने स्पष्ट केलं. दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांना मुख्य सूत्रधार म्हणत हे मनी लाँड्रिंगचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली -  आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना मुख्य सूत्रधार मानले आहे. आज दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर सीबीआयचे पथक चिदंबरम यांच्या चेन्नई येथील घरी दाखल झालं होतं. मात्र, चिदंबरम नसल्याकारणाने सीबीआयचे पथक रिकाम्या हाती परतले. 

दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायधीश यांनी वरिष्ठ न्यायाधीशांसमोर याप्रकरणी बुधवारी याचिका सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता उद्या म्हणजेच बुधवारी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर जलद गतीने सुनावणी होणार की नाही याचा निकाल येईल. दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांना मुख्य सूत्रधार म्हणत हे मनी लाँड्रिंगचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणी जामीन दिला तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं देखील कोर्टाने स्पष्ट केलं. 

आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा ठपका चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण २००७ मधील असून त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. सीबीआयने १५ मे २०१७ साली आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती यांना देखील अटक केली होती. सध्या कार्ती चिदंबरम जामिनावर आहेत. मात्र, आज दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे.   

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागArrestअटक