आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) के विशाखापत्तनम (Visakhapatnam) में वेंकोजी पालेम स्थित ज्ञानानंद आश्रम के प्रशासक पूर्णानंद सरस्वती को एमवीपी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. दरअसल, एक नाबालिग लड़की ने विजयवाड़ा के दिशा पुलिस थाने में मामला दर्ज करवाया था कि आश्रम में उसके साथ छेड़छाड़ की गई है...
तुमच्यापैकी अनेकांनी 'आश्रम' वेब सिरीज पाहिली असेल. एक ढोंगी बाबा त्याच्या आश्रममध्ये तरुणींचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे त्यात दाखवले आहे. असाच प्रकार आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून समोर आला आहे. येथील व्यंकोजी पालेम येथील ज्ञानानंद आश्रमातील प्रमुख पूर्णानंद सरस्वती याच्यावर एका अल्पवयीन मुलीने अत्याचाराचे गंभीर आरोप केला आहे.
आश्रमात तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार तरुणीने पोलिस ठाण्यात दाखल केली. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी सोमवारी रात्री पूर्णानंद स्वामीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने त्यांना सांगितले की, पूर्णानंद स्वामीने एकदा नव्हे तर अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यासोबतच तिचा मानसिक छळही करण्यात आला आहे. तिला आश्रमातून बाहेर पडता येत नव्हते. अनेक प्रयत्नांनंतर ती कशीबशी आश्रमातून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि थेट विजयवाडा गाठले.
मुलीच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आई-वडिलांच्या निधनानंतर ती आजीच्या घरी राहू लागली. पण काही काळानंतर म्हणजे दोन वर्षांपूर्वी तिच्या आजीनी तिला ज्ञानानंद आश्रमात दाखल केले. तेव्हापासून ती तिथेच राहत होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. मुलीला मेडिकलसाठी पाठवण्यात आले आहे. यासोबतच आरोपी पूर्णानंद सरस्वती याचीही चौकशी करण्यात येत आहे.