शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
2
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
3
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
4
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
5
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
6
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
7
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
8
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
9
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
10
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
11
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
12
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
13
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
14
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
15
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
16
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
18
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात फजिती! फक्त ७ ओव्हर्सची मॅच; त्यातही पाकनं गमावल्या ९ विकेट्स
19
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
20
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा

लग्नातील जेवणाच्या पंगतीतून उठविल्याने संताप; युवकाचा वाढप्यावर चाकूहल्ला

By सुरेंद्र राऊत | Published: May 14, 2023 3:37 PM

बाेरीसिंहची घटना : दाेघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

यवतमाळ : लग्नाच्या पंगतीत बसून जेवणाचा आनंद घेत वाढप्यांना त्रस्त करणाऱ्याला पंगतीतून उठविले. यामुळे संतापलेल्या दाेघांनी थेट चाकूने हल्ला केला. ही घटना बाेरीसिंह येथे शुक्रवारी रात्री घडली. हल्लेखाेरांपैकी एक ग्रामस्थांच्या हाती लागला. त्याला चांगलाच चाेप दिला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी आहे.

राहुल नंदकिशाेर केसलकर, असे जखमीचे नाव आहे. दिनेश लक्ष्मण बहिरम यांच्याकडे भाचीचे लग्न हाेते. या लग्नात यवतमाळातील पाहुणे मंडळी आली हाेती. त्यांना पंगत बसवून जेवण देण्यात आले. गावातील युवक पंगतीत वाढण्याचे काम करत हाेते. दाेन ते तीन पंगती उठल्या तरी एक युवक जागेवरून उठण्यास तयार नव्हता. त्याला समजावून सांगितल्यानंतरही ताे वाढप्यांना त्रास देत होता. शेवटी त्याला खडसावून पंगतीबाहेर काढले. यामुळे ताे युवक संतापला, त्याने त्याच्या भावाला बाेलावून घेतले. नंतर हाच ताे उठविणारा म्हणत राहुल केसलकर याच्यावर चाकूने हल्ला केला. राहुलच्या पाठीत चाकू भाेसकला, या झटापटीत हल्लेखाेरापैकी एक हाती लगाला. त्याला ग्रामस्थांनी बदडून काढले. नंतर वडगाव जंगल पाेलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी दिनेश बहिरम यांच्या तक्रारीवरून प्रणय कैलास चेलपेलवार (२२), रा. अंबिकानगर, यवतमाळ याच्यासह दाेघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास ठाणेदार संजीव खंदारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक भास्कर दरणे करीत आहेत.

 

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस