जळगाव : सकाळी झालेल्या वादाची पोलिसात तक्रार दिल्याचा राग आल्याने नगरसेवक शफी शेख सलीम यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री पिंप्राळा हुडकोत घडली. या घटनेत नगरसवेक गंभीर जखमी झाले असून बेशुध्द आहेत. याप्रकरणी हसन शेख अफजल, कामरान शेख रउफ अब्दुल, राजा शेख अलीम व अलीम शेख युसुफ यांच्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंप्राळा हुडको भागात कोरानाचा रुग्ण आढळून आल्याने तेथे काही लोकांनी गर्दी केली होती. बुधवारी दुपारी नगरसवेक शफी शेख सलीम हे गर्दी करु नका, डॉक्टरांना सहकार्य करा असे मोठ्या आवाजाने बोलले, त्याचा हसन शेख याला राग आला व त्यामुळे त्याने नगरसेवकाचे भाऊ जमील शेख व आई असीनाबी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यामुळे या दोघांनी दुपारीच रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरुन हसनविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
घरी जावून केला हल्लादरम्यान,आपल्याविरुध्द पोलिसात तक्रार दिल्याची माहिती हसन याला समजल्याने त्याने रात्री आठ वाजता नगरसेवकाच्या घरी येऊन ते जेवण करीत असताना बाहेर आरडाओरड सुरु केली. त्यावर हसन याला काय झाले म्हणून विचारणा केली असता हसन व सहकाºयांनी लोखंडी पाईप व काठ्यांनी शफी शेख, भाऊ जमील शेख यांच्यावर हल्ला केला. कामरान शेख याने शफी यांच्या कपाळावर डोक्यावर लोखंडी पाईप टाकून गंभीर दुखापत केले. हा वाद पाहून इतर नातेवाईक धावून आले. त्यांनी भांडण सोडवासोडव केले. नंतर दोन्ही जखमी भावांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जमील शेख गुरुवारी शुध्दीवर आल्याने त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
विजय मल्ल्या प्रत्यार्पणाची निव्वळ अफवा? लवकरच भारतात आणण्याचे वृत्त ईडीने फेटाळली
धक्कादायक! ठाण्यात लग्नाचे अमिष दाखवून मेैत्रिणीवर लैंगिक अत्याचार