ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल... मुलांना रागवायचं की नाही, असा प्रश्न पडेल. कारण एका १४ वर्षाच्या मुलाने स्वतःच्या वडिलांना घरात कोंडीन जिवंत जाळले. अभ्यासा न करण्यावरून आणि पैसे चोरल्याच्या कारणावरून वडिलांनी त्याला झापले होते. त्यानंतर रागाच्या भरात त्याने वडिलांनाच संपवलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे हरयाणामधील फरिदाबादमध्ये घडली आहे. १४ वर्षाच्या मुलाने आधी वडिलांना घरात कोंडले. त्यानंतर त्यांना पेटवले आणि छतावर गेला आणि उडी मारून पळून गेला.
बापासोबत वाद, मुलाने असं संपवलं?
फरिदाबादमधील नवीन नगरमध्ये ही घटना घडली आहे. आलम अन्सारी मयत व्यक्तीचे नाव आहे. आलम यांनी त्यांच्या १४ वर्षाच्या मुलाला झापले. पैसे चोरतो आणि अभ्यासकडे लक्ष देत नाही म्हणून त्यांनी झापले.
वडील रागावले म्हणून १४ वर्षाच्या मुलाला राग आला. घरात असतानाच त्याने आतून घराचा दरवाजा लावला. त्यानंतर नंतर त्यांना पेटवून दिले.
घरात आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांनी बघितले. ते धावून आले. त्यांनी आग विझवून अन्सारींना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत खूप उशिर जाला होता. दरम्यान, मुलगा घराच्या छतावर गेला. आणि खाली उतरून पळून गेला. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.