मुंबई : हॉर्न वाजवल्याच्या रागात पोलिसाला मारहाण केल्याची घटना मालाडमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यभरात १७५ हून अधिक गुन्हे नोंद आहेत. मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सुशांत हिंदुराव मोहिते (३२) यात जखमी झाले आहेत.
मिसिंगचा अहवाल बनविण्यासाठी शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास लॅपटॉप घेण्याकरिता मोहिते घरी सिव्हिल कारने निघाले. गोरेगाव पूर्वेकडील नागरी निवारा परिषदेजवळ आंब्याचा ट्रक उभा होता. त्याच्या बाजूला दुहेरी पार्किंगमध्ये डाव्या बाजूस रिक्षा उभी होती. त्यामुळे मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी हॉर्न वाजवला. तेव्हा शेजारील इनोव्हा चालकाने हॉर्न का वाजवला, असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘यहा से निकल नही तो भारी पडेगा’, अशी धमकी दिली. त्यांनी मोबाइलमध्ये घटनास्थळाचे शुटिंग केले. पावणे तीनच्या सुमारास तो चालक इमारतीच्या गेटकडे दिसला. त्याने पोलिसाला पाहून रागाने पाहिले. त्यांनी त्याच्या शेजारीच गाडी पार्क करत पोलीस असून याच इमारतीत राहत असल्याचे सांगितले. रागाने चालक अंगावर धावून आला. त्याच्या सोबत असलेल्या वृद्धानेही धक्काबुकी केली.पायाच्या त्रासामुळे मोहिते तोल जावून खाली पडताच त्यांना हातातील चावीने मारहाण केली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले. तेथे उपचार घेत त्यांनी दिंडोशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी इनोव्हा गाडीचा चालक वहिद वली मोहोम्म्द शेख (२७), चालकाचा भाऊ सोहेल वली मोहोम्मद शेख (२५), चालकाच्या शेजारी बसलेले त्याचे वडील वली मुहम्मद शेख (५७) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात तिघांना अटक करण्यात आली आहे.घटनेचे चित्रीकरणमार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी हॉर्न वाजवला. तेव्हा शेजारील इनोव्हा चालकाने हॉर्न का वाजवला, असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘यहा से निकल नही तो भारी पडेगा’, अशी धमकी दिली. त्यांनी मोबाइलमध्ये घटनास्थळाचे शूटिंग केले.