वसई - वसईच्या सनसिटी मैदानावर भर उन्हात रांगेत उभ्या असलेल्या एका 58 वर्षीय महिलेचा मंगळवारी अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना ताजी असताना आता पुन्हा येथील भर रांगेतील एका तरुणीला नीट उभी राहा व तोंडाला मास्क लाव असे सांगताना संतप्त झालेल्या त्या तरुणीने धिंगाणा घालून कर्तव्यावरील एका महिला पोलीस शिपायाला शिवीगाळ, धक्काबुकी आणि मारहाण करीत प्रसंगी हाताच्या दंडावर चावा देखील घेतल्याची धक्कादायक घटना वसईत सनसिटी मैदानावर घडल्याची माहिती माणिकपूर पोलिसांनी "लोकमत" ला दिली आहे.
या आरोपी तरुणीविरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून गायत्री आर.मिश्रा (35 ) रा.गास,कोपरी.विरार असे या आरोपी तरुणीचे नाव असून तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,वसईत लॉकडाऊन दरम्यान परराज्यात जाणाऱ्यां कामगार व त्यांच्या कुटुंबीयासाठी सरकारतर्फे श्रमिक ट्रेन सूटत असल्याने मागील काही दिवसापासून दररोज येथील सनसिटी मैदानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी वसईतून उत्तरप्रदेश राज्यासाठी सात श्रमिक ट्रेन सुटणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या वसई पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई सुमन बिना कांटेला या सनसिटी मैदान मंडप क्रं.1 येथे कर्त्यव्यावर असताना त्यांनी सर्वांना रांगेत उभे राहा असे सांगितले असता या आरोपी तरुणीला हटकले व तू सुद्धा नीट उभी राहा व तोंडाला मास्क लावण्याचे सांगताच या आरोपी तरुणीने संतप्त होऊन चक्क महिला पोलिसा सोबत आधी हुज्जत घातली त्यानंतर शिवीगाळ व प्रसंगी धक्काबुकी हि केली. मात्र हे सर्व इतक्यावरच न थांबता त्या आरोपी महिलेनं पोलीस महिलेच्या गणवेशाची कॉलर पकडून शर्टवरील ती नेमप्लेट देखील तोडली व शेवटी पोलीस महिलेच्या डाव्या हाताच्या दंडाला जोरदार चावा देखील घेतला आणि या सर्व प्रकारामुळे काही काळ मैदानावर वातावरण तापले होते.
सदरची महिला उत्तरप्रदेशमध्ये जाण्यासाठी या गर्दीत उभी होती मात्र तिचा श्रमिक ट्रेन साठी काही नंबर शेवट्पर्यंत आला नाही. या प्रकरणी फिर्यादी महिला पोलीस यांनी तात्काळ रुग्णालय गाठून वैद्यकीय तपासणी अंती आरोपी महिलेने केलेल्या कृत्याबाबत वरिष्ठांना माहिती देत माणिकपूर पोलीस ठाण्यात त्या आरोपी महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अजूनही या मारहाण धक्काबुकी ,शिवीगाळ व चावा मारणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलेली नाही. एकूणच कोरोनाच्या संकटात पोलीस म्हणजे हे कोरोना योध्ये असून वारंवार पोलीसावरील वाढते हल्ले म्हणजे हा एकप्रकारे लोकशाहीवर घाला आहे.आणि यासाठी अशा प्रवृत्तींना कडक शासन होणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक