मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी केली होती.
अनिल देशमुखांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. ईडीच्या तब्यात असलेल्या देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाकडने निर्देश दिले आहेत.