मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे देशमुखांना मोठा दणका बसला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात सीबीआयला देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार गुरुवारपासून सीबीआयने आर्थर रोड कारागृहात देशमुख यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली. ५ मार्चला पथक पुन्हा आर्थर रोड कारागृह गाठून देशमुख यांची चौकशी केली.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. दुसरीकडे चांदीवाल आयोगासमोरील चौकशीदेखील अंतिम टप्प्यात आहे. यातच सीबीआयने त्यांच्याकडे पुन्हा चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी, याबाबत सत्र न्यायालयात अर्ज केला होता.