भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांविरोधात राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा परब यांनी सोमय्यांविरोधात दाखल केला आहे. याआधी परब यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा यांनी सोमय्यांना दिला होता. ३ दिवसात माफी मागा नाहीतर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन, अशी नोटीस अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना बजावली होती. सोमय्या जाहीरपणे आपली वारंवार बदनामी करत असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून, माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला.
सोमवारी वंजारवाडी (ता. तासगाव) येथे पहिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या भाजपचे नेते मकरंद देशपाडे यांच्यासमवेत आले हाेते. सकाळी साडेदहा वाजता त्यांनी वंजारवाडीस भेट दिली.परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना इडीने समन्स बजावून चौकशीसाठी बाेलावले आहे. याबाबत सोमय्या म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे इडीच्या अधिकाऱ्यांकडे खरमाटे यांच्या ७५० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे. त्याचीच चौकशी सुरु झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचेही काऊंटडाऊन सुरु झालेले आहे.