शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

अंजली, निधीसोबत स्कुटीवर एक तरुणही, कंझावला घटनेत मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 8:36 AM

रविवारी रात्री कंझावला येथील अंजली सिंग (वय २०) हिच्या स्कुटीला एका कारने धडक देऊन तिला सुलतानपुरी ते कंझावलापर्यंत १२ किलोमीटर फरफटत नेले.

नवी दिल्ली : कारने फरफटत नेल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीसोबत स्कुटीवर असलेल्या तिच्या मैत्रिणीची पोलिस चौकशी करीत आहेत. या प्रकरणात आणखी एक फुटेज समोर आले आहे. एका व्हिडीओमध्ये एक तरुण स्कुटी चालवत असून, मागे अंजली आणि तिची मैत्रीण निधी बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.रविवारी रात्री कंझावला येथील अंजली सिंग (वय २०) हिच्या स्कुटीला एका कारने धडक देऊन तिला सुलतानपुरी ते कंझावलापर्यंत १२ किलोमीटर फरफटत नेले. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यानंतर अंजलीसोबत स्कुटीवर आणखी एक तरुणी(निधी) असल्याचे समोर आले होते. मंगळवारी निधीने पोलिसांसमोर जबाब नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणातील आणखी एक आरोपी आशुतोषला अटक केली आहे. दीपक खन्ना (२६), अमित खन्ना (२५), कृष्णा (२७), मिथुन (२६) व मनोज मित्तल हे अपघाताच्या वेळी कारमधून प्रवास करीत होते, त्यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आशुतोषवर आहे. याच आरोपावरून पोलिस आरोपी अमित खन्नाचा भाऊ अंकुश खन्ना याचाही शोध घेत आहेत. 

घटनेच्या वेळी कारमध्ये चौघेच होतेदिल्लीतील कंंझावला दुर्घटनेबाबत नवनवी माहिती प्रकाशात येत आहे. कार अंजलीला फरफटत घेऊन जात असताना कारमध्ये पाचजण होते, असे पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, तेव्हा कारमध्ये चारजणच होते, असे आता समोर आले आहे. दीपक नावाचा आरोपी घटनेवेळी घरी होता. मात्र, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना असल्याने आरोपींनी त्याला गुन्हा स्वत:वर घेण्यास भाग पाडल्याचे तपासांत समोर आले आहे. 

ड्रायव्हिंग लायसन्स नसताना चालवली कारघटनेच्या वेळी अमित कार चालवीत होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नाही. अंजलीच्या स्कुटीला धडक देऊन तिला फरफटत नेल्यानंतर तो त्याचा मित्र दीपककडे गेला व त्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्याच्याकडे लायसन्स नाही हे कळल्यावर दीपकने गाडी चालविण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली. 

आणखी तीन व्हिडीओ समोर३१ डिसेंबरच्या रात्रीचे आणखी तीन व्हिडिओ गेल्या २४ तासांत समोर आले आहेत. पोलिसांना घटनेच्या मार्गाचे २३ व्हिडिओ मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याआधारे आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी