मध्य प्रदेशच्या इंदौरमधील एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. घटना लसुडिया पोलीस स्टेशन परिसरातील पंचवटी कॉलनीतील आहे. पीडितेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. म्हणून होम क्वारंटाईन झाली होती. ती घरी एकटी राहत होती. याचा फायदा घेत गुरुवारी रात्री 3 बदमाशांनी तिच्या घरात प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने घरामध्ये घुसलेल्या तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. एवढ्यावरच न थांबता नराधमांनी ५० हजाराची रक्कम आणि २ मोबाईलही लंपास केले आहेत.
पोलिसांनी शनिवारी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने यातील दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच तिसरा आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. पीडिते महिलेने एसएसपी राजेश रघुवंशी यांना सांगितलं, की कोरोनाबाधित असल्याने ती एकटीच घरी थांबली होती. गुरुवारी रात्री दोन वाजता तिला जाग आली तेव्हा तिच्या बेडशेजारी तीन लोक उभा होते. या दरोडेखोरांनी चाकू, कटर आणि कात्रीचा धाक दाखवत तिच्याकडे पैसे आणि दागिने मागितले. तरुणीने त्यांना ५० हजार रुपये आणि दोन मोबाईल दिले. यानंतर तिघांनीही महिलेवर सामूहिक बलात्कार केला. मात्र, कोरोनामुळे अशक्तपणा आल्यानं ती त्यांना विरोधही करू शकली नाही.
प्रियकर अन् प्रेयसीला कुऱ्हाडीने सपासप कापले; असहाय्य आई बाप खिडकीतून राहिले पाहत
पुढे पीडितेनं सांगितले की, त्यांच्या हातात चाकू आणि कात्री असल्यानं हत्येच्या भितीमुळे महिलेने बचावासाठी कोणालाही आवाज दिला नाही. पीडितेनं सांगितलं की, यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत एक आरोपी या महिलेच्या घराबाहेरच थांबला होता. जेणेकरुन ती पोलिसांकडे जाऊ नये. सकाळ होताच आरोपीने या ठिकाणाहून पळ काढला. इंदौरच्या लसूडिया ठाणा क्षेत्रातील पंचवटी कॉलनीत राहाणाऱ्या 37 वर्षीय युवतीच्या घरी गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी केली. तिच्या तक्रारीनुसार तीन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यात आली.
एमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु
आयजी हरिनारायण चारी मिश्रा म्हणाले की, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तिन्ही आरोपींची ओळख पटवली असून दोन आरोपींना ताब्यात घेतलं. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला असून ते दोघंही अल्पवयीन आहेत. यातील एका आरोपीचं नाव दीपक आहे. पोलिसांनी सांगितले की, एक आरोपी नाल्यात लपला होता. दोघांनीही चोरीच्या अनेक घटनांमध्ये सामील असल्याची कबुली दिली आहे. आरोपी दीपक अद्याप फरार आहे. तो पंचवटीच्या परिसरात राहतो. त्याने त्या महिलेला एकटं पाहून हा कट रचला असून तो महिलेच्या शेजारच्या परिसरात राहतो. तरुणी घरी एकटी असल्याचं पाहूनच त्यानं हा संतापजनक कट आखला होता. दीपक अजूनही फरार आहे. त्याची माहिती देणाऱ्यास २० हजाराचं बक्षीस जाहीर कऱण्यात आलं आहे. दोन महिन्यांआधीच तो तुरुंगातून बाहेर आला होता.