लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेत अज्ञात आरोपी ग्राहकाने वेगवेगळ्या वेळी १०० रूपयांच्या ७१ नकली नोटा जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान घडली. आरापी ग्राहकाने बँकेच्या पद्धतीनुसार प्रत्येक व्यवहारात ५ किंवा त्यापेक्षा जास्त नोटा जमा केल्या. या नोटांना मुद्रा प्रबंधक केंद्र मुंबई कार्यालयाच्या आदेशावर नाशिक नोट प्रेस येथे पाठवण्यात आले. त्यानंतर या नोटा नकली असल्याची बाब उघडकीस आली. आरबीआयच्या अधिकारी फिर्यादी रोहिणी टिपले यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४८९ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रिझर्व्ह बँकेत अज्ञात आरोपीने जमा केले ७१ नकली नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:22 AM