मडगाव - गोव्यात सगळीकडे निवडणुकीची धामधूम चालू असताना दक्षिण गोव्यातील वादग्रस्त राजकारणी मिकी पाशेको व अन्य दोघांवर समुद्र किना-यावर भरधाव गाडी चालवून लोकांच्या जीवाला धोका पोहोचविल्याच्या आरोपाखाली वेर्णा पोलिसांनी मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
मागच्यावर्षी पाशेको यांनी उतोर्डा समुद्र किना-यावर प्रतिबंधित जागेत वाहन चालवून या भागातील जलक्रीडा चालकांच्या सामानाची नासधुस केली होती. या संबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण गोव्यात गाजले होते. त्यानंतर वेर्णा पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल घेत पाशेको व त्याचे अन्य दोन सहकारी रॉबिन व सेबेस्तियांव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.न्यायालयीन सुत्रकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो या तिघांही विरोधात वेर्णा पोलिसांनी भादंसंच्या 336 (सार्वजनिक जागेत लोकांच्या जीवाला धोका पोहोचविणो) तसेच 504 व 506 (धमक्या देणो) या कलमाखाली आरोपपत्र दाखल केले आहे. 24 जून 2019 रोजी या तिन्ही संशयितांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर रहाण्यासाठी तारीख निश्र्चित केली आहे.