शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

परमबीर सिंगांविरुद्ध खंडणी वसुलीची आणखी एक तक्रार; लवकरच एफआयआर दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 9:46 AM

प्रदीप शर्मा यांच्यावरही आरोप : खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकल्याचा दावा

ठळक मुद्देकाही अधिकाऱ्यांनी धमक्या देऊन तब्बल साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोपइतक्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तर केतन तन्ना या आपल्या मित्राकडूनही एक कोटी २५ लाख रुपये वसुलीकाच आठवड्यात सिंग यांच्याविरुद्ध ही दुसरी तर आतापर्यंत ठाण्यातील ही तिसरी तक्रार

ठाणे : ठाणे आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त तसेच गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग आणि ठाणे खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध क्रिकेट बुकी सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी करोडोंच्या खंडणी वसुलीची तक्रार गुरुवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. एकाच आठवड्यात सिंग यांच्याविरुद्ध ही दुसरी तर आतापर्यंत ठाण्यातील ही तिसरी तक्रार आहे.

ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त सिंग यांच्याच आदेशावरून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी धमक्या देऊन तब्बल साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनूने केला आहे. इतक्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तर केतन तन्ना या आपल्या मित्राकडूनही एक कोटी २५ लाख रुपये वसुली केल्याचे त्याने म्हटले आहे. परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्याच पथकातील तत्कालीन निरीक्षक राजकुमार कोथमिरे तसेच इतर काही अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकल्याचा आरोपही त्याने केला आहे. काही खासगी व्यक्ती आणि कुख्यात गुंड हे पोलिसांचे एजंट म्हणूनही वसुली करीत होते, असाही आरोप त्याने केला आहे. 

दरम्यान, सिंग यांच्याविरुद्ध ठाण्यात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले असून ही तिसरी तक्रार दाखल झाली आहे. याआधी कल्याणच्या बाजारपेठ आणि ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यातही खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात मात्र, एका पोलीस निरीक्षकानेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लवकरच एफआयआर होणार दाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आपण तक्रार केली होती. त्याचीच राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने शहानिशा केली. गेल्या तीन महिन्यांपासून आपण हे आरोप केल्यानंतर आता ठाणेनगर पोलिसांकडून जबाब नोंदविले जात असून लवकरच एफआयआरदेखील दाखल होणार असल्याचा दावा सोनू जालान याने केला.

सोनू जालान या बुकीने केलेल्या तक्रारीवरून त्याचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.- अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंग