पुणे : खलिस्तानवादी चळवळीशी संबंध असल्याच्या कारणावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला पंजाब येथून अटक केले आहे.मोहीउद्दीन सिद्दिकी ऊर्फ मोईन खान (वय ३७, रा. उत्तरपूर्व दिल्ली) असे त्याचे नाव आहे. हरपालिसंग प्रतापसिंग नाईक याला यापूर्वीअटक केली आहे. मोहीउद्दीनला पंजाब येथील सरहंद पोलिसांनी बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा, आर्म्स अॅक्टनुसार अटक केली होती. त्याचा हरपालसिंग याच्याशी संबंध असल्याने या गुन्ह्यात अटक केली आहे. कारागृहात असलेल्या खलिस्तानवाद्यांना बाहेर काढण्यात व दहशतवादी टोळी स्थापन करून भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्यासाठी खलिस्तान निर्मितीसाठी हत्यारे गोळा करण्यात मोहीउद्दीन संबध होता, असे सोशल मीडियावरील हालचाली आणि मोबाईल डेटाच्या विश्लेषणातून समोर आले आहे.अटक करण्यात आलेला हरपालसिंगचा पाकिस्तान, सौदी अरेबिया येथील लोकांच्या तो सातत्याने संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.हरपालसिंग याच्याकडूनजप्त करण्यात आलेले पिस्तुल मोहीउद्दीनने विकले असल्याचे समोर आले आहे.गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने एटीएसकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार विशेष न्यायालयानेत्याला ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. नाईक हादेखील ३१ पर्यंत कोठडीत आहे. त्याचा २० देशांतील लोकांशी संर्पक असल्याचे तपासातून पुढे आले आहे. आता दोघांचीही समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे.
दहशतवादविरोधी पथक : पंजाबमधून आणखी एका खलिस्तानवाद्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 1:56 AM