एनआयएच्या अटकेतील पोलीस निरीक्षक सुनील माने याची कार जप्त करण्यात आली आहे. NIAने अंधेरी, कांदिवली आणि बोरिवली परिसरात छापेमारी करुन मानेची लाल रंगाची गाडी जप्त केली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेला अटक करण्यात आली आहे. निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या अनेक आलिशान कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.
निलंबित पोलीस निरीक्षक सुनील मानेचे जुने कार्यालय असलेल्या कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ मध्येही एनआयएने छापेमारी केली. बोरिवलीतील साईनगर परिसरातून सुनील मानेची लाल रंगाची कार एनआयएने ताब्यात घेतली. दोन गाड्यांच्या नंबर प्लेट सारख्याच असल्याचे समोर आले आहे. सुनील माने हा मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. वाझे प्रकारणानंतर त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
Mansukh Hiren : मनसुख हिरेन प्रकरणात NIA ने पोलीस निरीक्षक सुनील मानेंना केली अटक
एनआयएच्या अटकेतील निरीक्षक सुनील माने निलंबित
ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी विनायक शिंदे नाही, तर सुनील माने यानेच फोन करुन बोलावलं होतं. सुनील माने मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचंही एनआयएने कोर्टात सांगितलं. NIA कडे मनसुख हिरेनचा तपास येण्याआधी दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेला एनआयएने अटक केली आहे.