शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Antilia  Bomb Scare : मुकेश अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओप्रकरणी तिहार जेलमधील दहशतवादी अख्तरकडून मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 1:56 PM

Antilia Bomb Scare : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका शोध मोहिमेदरम्यान तो ताब्यात घेतला.

ठळक मुद्देतिहार जेलमधील बॅरेक क्रमांक ८ मध्ये कैद असलेल्या इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी तहसीन अख्तरकडे हा मोबाईल सापडला आहे.

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवास्थानासमोर स्फोटक ठेवल्याची जबाबदारी घेणारा मसेज ज्या मोबाईलवरून आला होता. तो मोबाईल तिहार जेलमधला असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. तिहार जेलमधील बॅरेक क्रमांक ८ मध्ये कैद असलेल्या इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी तहसीन अख्तरकडे हा मोबाईल सापडला आहे. दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने एका शोध मोहिमेदरम्यान तो ताब्यात घेतला.या फोनवरूनच टेलीग्राम चॅनेल चालविला जात असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यातून अंबानींच्या घरासमोर स्फोटक ठेवण्याची जबाबदारी घेण्यात आली होती. फोनची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अधिकृत सूत्रांच्या हवालाने सांगितले की, खासगी सायबर एजन्सीला तपास यंत्रणेने संबंधित मोबाईल क्रमांक ट्रॅक करण्यास सांगितले होते. त्यानंतर तिहार जेलमधील लोकेशन ट्रेस झाल्यानंतर केंद्रीय एजन्सींनी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला ही माहिती दिली असल्याचे ते म्हणाले. 

२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्यात जिलेटीनच्या २० कांड्या, बोगस नंबर प्लेट्स आणि धमकीचे पत्र सापडले होते. या घटनेने मुंबईत खळबळ माजली होती. नंतर अंबानींच्या मोबाईलवर धमकीचा टेलिग्राम मेसेज आला होता. हा मेसेज दिल्लीतील तिहार जेलमधील बराकमध्ये वापरत असलेल्या मोबाईलमधून आला असल्याचं तपासात समोर आलं. 

 

Mukesh Ambani : दिल्ली कनेक्शन... 'त्या' दिवशी मुकेश अंबानींना टेलिग्रामवर आलेला धमकीचा मेसेज तिहार जेलमधून

 

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी टेलीग्राम चॅनेल तयार करण्यात आले होते आणि  अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ ठेवल्याची जबाबदारी घेणारी मेसेज २७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अंबानींच्या टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर पोस्ट करण्यात आला होता. या मेसेजमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे पाठवण्याची मागणी देखील केली होती आणि ती जमा करण्यासाठीच्या लिंकचा उल्लेख केला होता.चौकशीदरम्यान ती लिंक “उपलब्ध नाही” म्हणून आढळले, त्यामुळे तपास करणार्‍यांना हे कोणीतरी त्रास देण्यासाठी कृत्य करत असल्याचा संशय आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नंतर २८ फेब्रुवारीला जैश-उल-हिंदचा आणखी एक मेसेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आला आणि घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला गेला. या प्रकरणातील तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. नंतर गृहमंत्र्यांनी याचा तपास एटीएसकडे सुपूर्द केला. त्यानंतर देखील या प्रकरणाचा तपास एटीएसकडून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या NIA कडे वळविण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीIndian Mujahideenइंडियन मुजाहिदीनArrestअटकdelhiदिल्लीPoliceपोलिसterroristदहशतवादीMobileमोबाइल