लैंगिक शोषणाच्या आरोपाचा सामना करत असलेल्या बॉलिवूडमधील दिग्दर्शक अनुराग कश्यपला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. अभिनेत्री पायल घोषनेअनुराग कश्यपविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाबद्दल गुन्हा दाखल केला होता. पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलीस लवकरच अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवणार आहेत.केंद्रीय मंत्री रामदास आठवले पायल घोषच्या लढाईत आवाज उठवत आहेत. आठवले यांनी मुंबई पोलिसांना अनुराग कश्यप यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर मुंबई पोलिसांनी लवकरच अनुराग कश्यपला अटक केली नाही तर ते धरणे आंदोलनाला बसतील. दरम्यान, आता पोलिस अनुराग कश्यप यांना समन्स पाठवून चौकशी करणार असल्याची बातमी आता समोर आली आहे. पायल घोष अनेक दिवसांपासून न्यायाची मागणी करत होती. पायल घोष हिने इशारा दिला होता की, जर तिला न्याय मिळाला नाही तर ती उपोषणाला बसणार आहे. दिग्दर्शकाला अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. तसेच आज पायल आपल्या वकिलांसोबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेटली असून तिने न्यायासाठी राज्यपालांची भेट घेतली आहे.