प्रेमासाठी कायपण! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने केला शोले स्टाईल ड्रामा
By पूनम अपराज | Published: November 9, 2020 06:37 PM2020-11-09T18:37:43+5:302020-11-09T18:38:05+5:30
Crime News : लग्न न झाल्यास उडी मरून आत्महत्या करण्याची धमकी तिने दिली. यावेळी पोलिसांनी तिची समजूत घालत मुलीला खाली उतरवले. जवळपास ४५ मिनिटे हे नाट्य सुरू होते.
अनेकदा एकतर्फी प्रेमातून प्रियकर हाय वॉल्टेज ड्रामा करताना आपण पाहिलं. शोले चित्रपटात वीरूने बसंतीला लग्नासाठी तयार करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढला हे दृश्य देखील आपण पाहिलं असेल. मात्र, मध्यप्रदेशमधील इंदौर येथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने हाय वॉल्टेज ड्रामा केल्याचं कळत आहे. एका अल्पवयीन मुलाशी लग्न करण्यासाठी प्रेयसी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली. लग्न न झाल्यास उडी मरून आत्महत्या करण्याची धमकी तिने दिली. यावेळी पोलिसांनी तिची समजूत घालत मुलीला खाली उतरवले. जवळपास ४५ मिनिटे हे नाट्य सुरू होते.
इंदौरच्या परदेशीपुरा परिसरात रविवारी सायंकाळी उशिरा एक तरुणी एका जाहिरात होर्डिंगवर मुलगी चढली आणि त्यामुळे हंगामा झाला होता. ती आपल्या प्रियकराशी लग्न करण्याच्या गोष्टीला घेऊन अडून बसली होती. तात्काळ पोलीस तेथे पोहचले आणि लग्नाबाबत खात्री देऊन तिची समजूत काढून तिला खाली उतरविले. जर प्रियकरासोबत लग्न झाले नाही तर उडी मारून आत्महत्या करेन, अशी धमकी मुलीने दिली होती.जवळपास ४५ मिनिटानंतर मुलीला होर्डिंगवरून खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले. प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने ती नाराज झाली आणि होर्डिंगवर चढली होती.
Madhya Pradesh: A girl climbed atop a hoarding at Bhandari Bridge in Indore's Pardesipura
— ANI (@ANI) November 9, 2020
"A minor girl climbed a hoarding demanding to marry a boy against her mother's wish. She later came down on boy's insistence," says Pardesipura Station Incharge Ashok Patidar
(08.11.2020) pic.twitter.com/lluvZVr9qc
तरुणी ३० फूट उंच होर्डिंगवर चढून बसली होती. दरम्यान तरुणी मोबाईलवर होती. स्थानिकांनी तिला खाली उतरण्यास आग्रह केला, मात्र तिने कोणाचे ऐकले नाही. हळूहळू या परिसरात खूप गर्दी जमा झाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे पोहचलं आणि तरुणीला खाली उतरवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वय १८ वर्ष आहे. ती एका अल्पवयीन मुलावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत लग्न करण्याची तिची इच्छा होती. परंतु, मुलीचे कुटुंबीय लग्न दुसरीकडे करत असल्याचा दावा मुलीने केला. यावेळी मुलीचे समुपदेशन करून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.