Online Class दरम्यान विद्यार्थ्याच्या आईसोबत वाद, शिक्षकानं केली आत्महत्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 09:20 PM2021-08-15T21:20:16+5:302021-08-15T21:21:01+5:30
Online Class : शिक्षकाचे मित्र आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या चुकीच्या वागणुकीला जबाबदार ठरवलं आहे. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा त्यांनी दावा केला आहे.
केरळमध्ये एका शाळेच्या शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या घटनेने शाळेत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकावर काही दिवसांपूर्वी एक हल्ला झाला होता. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतर ४४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह त्यांच्याच घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शिक्षकाचे मित्र आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या चुकीच्या वागणुकीला जबाबदार ठरवलं आहे. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा त्यांनी दावा केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली की, मृत सुरेश चलियथ यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाचं त्याच्या विद्यार्थ्याच्या आईसोबत वाद झाला होता. मात्र त्यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार केली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
शिक्षकांच्या मित्राने सांगितली हकीकत
शिक्षकाच्या मित्राने सांगितलं की, काही लोक गुरुवारी सुरेशच्या घरी आले होते. तेव्हा सुरेश घरी नव्हता. त्यांना फोन करून बोलवण्यात आले. जसा सुरेश घरी पोहोचला, लोकांनी त्याला मारहाण सुरू केली. दरम्यान त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ऑनलाईन क्लासदरम्यान एका विद्यार्थ्याच्या आईसोबत सुरेशचा वादविवाद झाला होता. हल्ला करणारे लोकं सुरेशला त्या वादाबाबत बोलत होते. सुरेशच्या मित्राने पुढे सांगितलं की, सुरेशला ते लोक जमिनीवरून घसरत खेचत गाडीपर्यंत घेऊन गेले आणि शिक्षकाला निर्जनस्थळी सोडले. या प्रकरणी सुरेशने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, मात्र याबाबतचा गुन्हा दाखल केला नसल्याचं शिक्षकाच्या मित्राने सांगितले.
शौचास जात असताना महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ९० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीरhttps://t.co/ZiwPAV79FM
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2021
विवाहबाह्य संबंधाने महिलेचा जीव घेतला; प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची हत्याhttps://t.co/DDKHrjT5pR
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2021