आविष्कार देसाईरायगड - रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांची आठ तास सुनावणी झाली. रायगड जिल्ह्याच्या इतिहासातच प्रथमच अशी हाय प्राेफाईल सुनावणी दिर्घकाळ पार पडल्याचे बाेलले जाते. या सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या हाेत्या.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्तेचा ठपका रायगड पाेलिसांनी अर्णब गाेस्वामी नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्यावर ठेवला आहे. पाेलिसांनी तीन्ही आराेपींना बुधवारी न्यायालयात हजर केले. या प्रकरणामध्ये अर्णब गाेस्वामी हे केंद्र बिंदू असल्याने न्यायालया बाहेर प्रचंड पाेलिसांचा फाैज-फाटा बंदाेबस्तासाठी ठेवण्यात आला हाेता. रत्नागिरी आणि पालघर येथून पाेलिसांची जादा कुमक मागवण्यात आली हाेती. त्यामुळे अलिबाग शहरालाच पाेलिस छावणीचे स्वरुप आले हाेते.अर्णब गाेस्वामी यांच्यासाठी वकीलांची फाैज उभी करण्यात आली हाेती. दिल्ली, मुंबईमधून व्हीसीच्या माध्यमातून निष्णांत वकील गाेस्वामी यांची बाजू मांडत हाेते. त्यामध्ये प्रामुख्याने अॅड. अबदाद फाेंडा यांचा प्रामुख्यांना समावेश हाेता. दाेन्ही बाजूकडून जाेरदार युक्तीवाद करण्यात आले. त्याचप्रमाणे सारडा आणि शेख यांची बाजू मांडण्यासाठीही वकील उपस्थित हाेते. त्यामुळे सुनावणी उशिरापर्यंत सुरु हाेती. दाेन टप्प्यात पार पडलेल्या या सुनावणीमध्ये प्रचंड खडाजंगी झाली. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात सुरु झालेली सुनावणी रात्री साडे अकरा वाजता संपली.
आराेपींना पाेलिस काेठडी मिळावी यासाठी या आधी इतकी दिर्घकाळ सुनावणी कधी झाल्याचे आठवत नाही. निंबाळकर खून खटल्यातही एवढा वेळ सुनावणी झाली नाही. मात्र गाेस्वामी प्रकरणात न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतरही न्यायालयाने निकाल दिल्यावरच कामकाज संपले, असे ज्येष्ठ वकीलांनी लाेकमतला सांगितले.