मुंबई - खासगी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी एन एम जोशी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर दाखल झालेल्या अनेक एफआयआर संदर्भात ही चौकशी करण्यात येणार आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीकेवरून खासगी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे दीड महिन्य़ापूर्वी मुंबईपोलिसांनी गोस्वामींची १२ तास चौकशी केली होती. आता पुन्हा चौकशीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार आज एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात गोस्वामी हजर झाले आहेत.
पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली. याप्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गोस्वामी यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून पोलिसांकडून रविवारी दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. आता सोमवारी आणखी एक नोटीस काढण्यात आली असून बुधवारी मुंबईतील पोलीस ठाण्यात चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. अर्णब गोस्वामींविरोधात विविध कलमांखाली २ मे रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानुसार त्यांची चौकशी केली जाणार आहे.
खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार
खाकीला काळिमा! फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक
गुड न्यूज! राज्यात ४८ तासात एकही पोलीस कोरोनाबाधित आढळला नाही