मुंबई : आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’ मध्ये अर्णब गोस्वामी आणि इतर दोन व्यक्तींची नावे असतानाही कोणताही तपास न करता कारवाई झालेली नसल्याने या प्रकरणी दोषींवर कायद्याप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी खालच्या दर्जाचे राजकारण केले आहे. याद्वारे अनेकांना बदनाम केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारची विनाकारण बदनामी केली आहे. आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या पत्नीने न्याय मिळण्याची मागणी केली आहे. अक्षता नाईक यांचा विनंती करणारा एक व्हिडिओ मला मिळाला आहे. त्यात ‘अर्णब गोस्वामी माझ्या सासू आणि नवऱ्याच्या आत्महत्येला, मृत्यूला जबाबदार आहेत. गेल्या सरकारने आमची केस दाबून टाकली मला न्याय मिळाला नाही. अर्णब हा गुन्हेगार असून त्याला अटक झाली पाहिजे, असे तिने यात म्हटल्याचे सरनाईक यांनी पत्रात लिहिले आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती.त्यात कोणत्या कारणाने व कोणामुळे आत्महत्या केली त्यांची नावे आहेत. त्याने व त्याच्या आईने अलिबागच्या घरी आत्महत्या केली होती. परंतू या प्रकरणाचा तपास झालेला नाही. नाईक कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी दाद मागूनही त्या प्रकरणात कोणाला अटक झाली नाही, असे या कुटुंबाचे म्हणणे आहे. एफआयआरनुसार गोस्वामी यांच्या मुंबईतील स्टुडिओचे काम आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या कंपनीने घेतले होते. त्या कामापोटी उर्वरित रक्कम ८३ लाख रुपये गोस्वामी यांनी नाईक यांना काम पूर्ण झाल्यानंतरही दिली नाही. वारंवार मागणी करूनही कामाचे हे पैसे परत न मिळाल्याने आर्थिक व मानसिक दडपण आल्याने अखेर नाईक यांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले, असे सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे.
बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ‘सुसाईड नोट’ ग्राह्य धरून आरोपीना अटक करण्यात आली होती. तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का दाखवली गेली नाही? त्यामुळे आता नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी सुसाईड नोट व पत्नीने नोंदवलेला एफ.आय.आर ग्राह्य धरून आरोपीवर अटकेची पुढील कारवाई करायला हवी अशीही मागणी आ.सरनाईक यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास का झाला नाही, पोलिसांवर कोणाचा दबाव होता याचीही चौकशी करावी असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली
Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??
सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले
आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...