कोलकाता : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय असलेली अर्पिता मुखर्जीच्या अडचणी वाढत आहे. आता अशीबातमी समोर येत आहे की, डायमंड सिटी फ्लॅट कॉम्प्लेक्समधून अर्पिताची 4 लक्झरी वाहने गायब आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की, या गाड्यांमध्ये रोकड भरलेली होती. या संपूर्ण प्रकरणात ईडी सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत आहे. मात्र, यादरम्यान ईडीने अर्पिताची मर्सिडीज कार जप्त केली आहे. रिपोर्ट्सनुसार, डायमंड सिटीमधून गायब झालेल्या दोन गाड्या अर्पिता मुखर्जीच्या नावावर आहेत.अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सायंकाळी उशिरा पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या चिनार पार्क परिसरात असलेल्या अन्य एका अपार्टमेंटवर छापा टाकला. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सुमारे २८ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर ईडीने मुखर्जी यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात केंद्रीय एजन्सीने मुखर्जी यांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात, ईडीने शहरातील आणखी एका फ्लॅटमधून 21 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड जप्त केली होती.
बापरे! 3 किलो सोन्याच्या विटा, 6 सोन्याच्या बांगड्या... पहा अर्पिता मुखर्जीच्या खजिन्यात आतापर्यंत काय सापडलं?
शनिवारी मुखर्जी यांच्या जागेवर छापे टाकून अंमलबजावणी संचालनालयाने रोख रक्कम, दागिने आणि 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे विदेशी चलन जप्त केले होते. सरकारी शाळा आणि अनुदानित शाळांमधील कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या वेळी चॅटर्जी हे शिक्षण विभागाचे प्रमुख होते. नंतर त्यांच्याकडून हा विभाग घेण्यात आला. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी त्यांना अटक केली होती. शालेय सेवा आयोगाकडून शिक्षक भरतीमध्ये कथित अनियमिततेच्या आरोपांची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत आहे.