नवी मुंबई - कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे हातमोजे पुन्हा वापरात आणले जात होते. अशा जुन्या हातमोज्यांची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून जुने व नवे असे सुमारे 4 क्विंटल वैद्यकीय हातमोजे आढळून आले आहेत.प्रशांत अशोक सुर्वे असे पोलिसांनीअटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सीबीडी सेक्टर 9 येथील राहणारा असून पावणे येथे जुन्या हातमोज्यांना धुवून पुन्हा विक्रीसाठी पॅकिंग करण्याचा व्यवसाय चालवला जात होता. त्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एक चे सहायक निरीक्षक राहुल राख यांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल राख, रुपेश नाईक, हर्षल कदम, भगवान तायडे, रोहिदास पाटील, बालाजी चव्हाण आदींच्या पथकाने मंगळवारी दुपारी गामी इंडस्ट्रियल पार्क येथील 29 व 80 क्रमांकाच्या गाळ्यावर छापा टाकला. यावेळी प्रशांत सुर्वे हा त्याठिकाणी आढळून आला. शिवाय नवे व जुने सुमारे 4 क्विंटल वैद्यकीय हातमोजे आढळून आले. त्याशिवाय दोन वॉशिंग मशीन, ब्लोअर मशीन असे साहित्य आढळून आले. त्याची किंमत 6 लाख 10 हजार रुपये आहे. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरलेले हातमोजे जमा केले जायचे. त्यानंतर जुन्या हातमोज्यांना वॉशिंगमशीन मध्ये धुवून पुन्हा ते विक्रीसाठी नवीन बॉक्समध्ये भरले जायचे. अशाप्रकारे त्यांनी आजवर अनेक ठिकाणी कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरलेले जुने हातमोजे विकले असल्याचे समोर आले आहे. यामागे मोठ्या टोळीचा हात असल्याची शक्यता आहे. त्यानुसार संबंधितांविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या टोळीकडून सुरु असलेल्या कृत्यामुळे अनेक रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचारी व साधारण रुग्ण यांच्याही आरोग्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कोविड रुग्णाच्या उपचारासाठी वापरलेले वैद्यकीय साहित्य योग्य पद्धतीने नष्ट करणे आवश्यक असतानाही या टोळीकडून वापरलेले हातमोजे धुवून पुन्हा विकले जात होते. मात्र, त्यांना हे हातमोजे कोण पुरवत होते याचा उलगडा होऊ शकलेला नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर
दाऊदच्या हस्तकाने केला मोठा खुलासा, नेपाळमधून भारतात पाठवत होता नकली सोनं अन् नोटा
सेक्स रॅकेटचा भांडाफोड, युनिसेक्स स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय अन् आक्षेपार्ह वस्तू सापडल्या