नवी मुंबई : क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग लावणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून बेटिंग च्या साहित्यासह २ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री कोपर खैरणे येथील घरावर छापा टाकून हा सट्टा उघडकीस आणला आहे.
क्रिकेटचे सामने सुरु झाले कि त्यावर बेटिंग लावले जाते. यामाध्यमातून लाखो रुपयांचा सट्टा लावला जात असतो. त्यानुसार सध्या सुरु असलेल्या आयपीएल चे टी २० क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावले जात आहे का याकडे पोलीस लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान कोपर खैरणे मधील एक व्यक्ती ऑनलाईन बेटिंग लावत असल्याची माहिती गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या पथकाने कोपर खैरणे सेक्टर ८ येथील सुयश स्वराज सोसायटी मधील घरावर शुक्रवारी रात्री छापा टाकला. यावेळी विजय खैरनार (३९) हा घरामध्ये आढळून आला. तो बेटिंग लावण्यास इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना फोनवरून संपर्क साधून बेटिंग चे दर सांगत होता. तर बेटिंग लावण्यासाठी मोबाईल मधील ऍप्लिकेशनचा वापर करत होता. यासाठी त्याला संबंधित ऍप्लिकेशनचा आयडी कोनी पुरवला याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याच्याकडून दोन मोबाईल, टिव्ही तसेच दोन लाख रुपयांची रोकड असा २ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर बेटिंग लावल्या प्रकरणी खैरनार याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात कोपर खैरणे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे
Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!
धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या
विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी
दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या
दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन