शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

वीस वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

By शेखर पानसरे | Published: July 11, 2023 5:03 PM

पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

घारगाव : वीस वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला घारगाव (ता. संगमनेर) पोलिसांनी अटक केली. सोमवारी (दि.१०) संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात अत्याचाराची घटना घडली होती. सचिन ठका खंडागळे (रा. अकलापूर, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.     वीस वर्षीय दिव्यांग मुलीच्या घरी तिचे आई-वडिल नव्हते, मुलगी आणि तिचा लहान भाऊ असे दोघेच घरी असताना सचिन खंडागळे व त्याचा मुलगा तेथे गेले. मुलीचा भाऊ आणि खंडागळे याचा मुलगा या दोघांना घरामागे काढून दिले. त्यानंतर मुलीवर त्याने शारीरिक अत्याचार केले. संध्याकाळी मुलीचे आई-वडिल घरी आल्यानंतर तिने घडला प्रकार आईला सांगितला. 

तिचे आई-वडिल खंडागळे यास विचारणा करण्यास गेले असता त्याने त्यांना काठीने मारहाण करत धमकी दिली. पिडित मुलीने घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. सचिन खंडागळे याला अटक करण्यात आली असून घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी