डोंबिवली: एका 12 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना 30 जानेवारीला पुर्वेकडील एमआयडीसी निवासी भागात घडली होती. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला होता. नराधमाने टोपी घातल्याने तो स्पष्ट दिसून येत नव्हता. दरम्यान त्याची काळया कलरची दुचाकी कॅमेरात दिसून आली त्या दुचाकीचा इंडिकेटर तुटल्याचे दिसत होते. त्या आधारे तपास करीत मानपाडा पोलिसांनी अमन यादव या तरूणाला मंगळवारी अटक केली. तो प्रयागराज विद्यापीठातील विद्यार्थी असल्याचे चौकशीत समोर आले असून तो सोनारपाडा परिसरात राहणा-या आईवडीलांकडे आला होता.
पिडीत मुलगी ती राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या माळयावर खेळत असताना तीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. मुलीने घडलेला प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. घरातील लोक त्या तरु णाला पकडण्यासाठी घराबाहेर पडले. तोर्पयत तो पसार झाला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.आरोपीने काळी टोपी घातली होती तसेच मास्क परिधान केल्याने तो स्पष्ट दिसून येत नव्हता. याबाबत मानपाडा पोलिस ठाण्यात पिडीतेच्या वडीलांनी तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलिस आयुक्त जे.डी.मोरे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश वनवे यांच्या पथकाने या गुन्हयाचा तपास सुरु केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासण्यात आले. ब्लॅक कलरची युनिकॉन दुचाकी सीसीटीव्हीत कैद झाली होती.
डोंबिवलीत खळबळजनक, सोफा कम बेडमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
रिक्षामध्ये २५ वर्षीय तरुणीवर गँगरेप; जोरजोरात गाणं वाजवल्याने पीडितेची मदतीची हाक पोहोचली नाही
तुटलेल्या इंडिकेटरवरून आरोपीचा शोधदुचाकी सीसीटिव्हीत कैद झाली असता डोंबिवलीत अशा किती जणांकडे युनीकॉन दुचाकी आहेत. याची माहीती आरटीओकडून घेण्यात आली. दहा हजार जणांकडे अशा प्रकारची बाईक आहेत. त्यामध्ये ब्लॅक कलरच्या दुचाकी 3 हजार 200 आहेत. त्यापैकी सोनारपाडा परिसरात 80 जणांकडे ही दुचाकी आहे. मात्र कोणत्या ब्लॅक कलरच्या दुचाकीचे इंडिकेटर तुटले आहे. त्यापैकी एक दुचाकी पोलिसांनी शोधून काढली ती अमन यादवची होती. पोलिसांनी यादवला ताब्यात घेतले. दोन ठिकाणच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला होता.