शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

उद्योजक भरतीयांच्या घरी चोरी करणाऱ्याला बिहारमधून अटक! 

By आशीष गावंडे | Updated: July 23, 2024 17:50 IST

सहकार नगर मधील उद्योजक ब्रिजमोहन भरतीया यांच्या बंगल्यात शिरून चोरट्यांनी सुमारे ४४ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना ३ मे रोजी मध्यरात्री घडली होती.

अकोला : शहरातील सहकार नगरमधील उद्योजक ब्रिजमोहन भरतीया यांच्या बंगल्यात धाडसी घरफोडी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७८ दिवसांच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर घरफोडीतील मुख्य सूत्रधाराला बिहार मधून शिताफिने अटक केल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. 

यादरम्यान, मुख्य आरोपीकडून २५ लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे (४०) रा. ग्राम वझर, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तत्पूर्वी या प्रकरणात जिगर कमलाकर पिंपळे (३७) रा. पाखोरा ता. गंगापूर तसेच सुनील विठ्ठल पिंपळे  (५०) रा. गुरु धानोरा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

सहकार नगर मधील उद्योजक ब्रिजमोहन भरतीया यांच्या बंगल्यात शिरून चोरट्यांनी सुमारे ४४ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना ३ मे रोजी मध्यरात्री घडली होती. हा प्रकार ४ मे रोजी कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. 

ही कारवाई ‘एलसीबी’ पथकातील 'एपीआय' श्रीधर गुट्टे, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, आशिष शिंदे, पोहवा अब्दुल माजिद, अविनाश पाचपोर, रवींद्र खंडारे, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, वसीमोद्दीन, राहुल गायकवाड, सायबर सेलचे आशिष आमले, गोपाल ठोंबरे, प्रशांत कमलाकर, सीमा ढोणे तसेच जालना येथील दहशतवादी विरोधी पथकाचे विनोद गर्डे यांनी केली.

पाच राज्यात सात हजार किमीचा प्रवासघरफोडी, जबरी चोरी व लुटमार करणे हा या टोळीचा परंपरागत व्यवसाय आहे. पोलिसांच्या ताब्यात सापडू नये, यासाठी ते मोबाईलचा वापर करत नाहीत.  त्यामुळे या आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेसमोर उभे ठाकले होते. तपास पथकाने महाराष्ट्रासहित मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच बिहार अशा पाच राज्यांमध्ये विविध ठिकाणी तब्बल सात हजार किलोमीटरचा प्रवास करून आरोपींचा छडा लावला, हे येथे उल्लेखनीय. 

आरोपी पळून जाण्याच्या बेतातघरफोडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार विवेक पिंपळे हा बिहार मधील एका गावात असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव व त्यांचे पथक तातडीने बिहारकडे रवाना झाले. आरोपीला पोलिसांचा सुगावा लागताच तो पळून जाण्याच्या बेतात होता; परंतु, त्यापूर्वीच पथकातील पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. यापूर्वीही मुख्य आरोपीने पोलिसांना मध्य प्रदेशातील विदिशा येथून गुंगारा दिला होता. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले सर्व अवजारे, हत्यार व सोने जप्त केले.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी