कल्याण : वृद्ध नागरिकांना विशेषतः महिलांना भूलथापा देत विश्वास संपादन करत हातचलखीने त्यांच्या जवळील दागिने, मोबाईल, रोकड लंपास करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांना गजाआड केलं आहे. दत्ता काळे असे या म्होरक्याचे आहे. दत्ताचे साथीदार राहुल पवार,कन्हैय्या काळे हे याआधीच जेलची हवा खात आहे
रस्त्याने पायी चालणाऱ्या वृद्ध नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला कोणत्या तरी भूलथापा देत त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील दागिने लंपास करणाच्या घटना कल्याण डोंबिवलित वाढल्या होत्या. पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही च्या साहाय्याने सीसीटीव्ही मध्ये दिसणारे राहुल पवार, कन्हैय्या काळे दोघांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती, यांचा म्होरक्या दत्ता काळे देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दत्ता हा चोरीचे दागिने पैसे आणतो व मिळालेले पैसे वाटून घ्यायचा. या तिघांकडून पोलिसांनी एकूण 2 लाख 40 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 1400 रुपये रोकड हस्तगत करण्यात आले आहेत. यामधील राहुल उर्फ बाबू रमेश पवार यांच्या विरोधात महात्मा फुले ,मुलुंड,कोणगाव पोलीस स्थानकात मिळून आठ गुन्हे आहेत. दुसरीकडे कन्हैया विरोधात महात्मा फुले ,कोणगाव,वर्तकनगर,पायधुनी, कुर्ला पोलीस स्थानकात 11 गुन्हे तर दत्ता विरोधात महात्मा फुले पोलीस स्थानकात 2 गुन्हे दाखल आहेत .